करमाळा

विक्रमवीर महेश वैद्य देणार करमाळा येथे “हॅपी माईंड, हॅपी हेल्थ”चे धडे!!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

विक्रमवीर महेश वैद्य देणार करमाळा येथे “हॅपी माईंड, हॅपी हेल्थ”चे धडे!!

करमाळा (प्रतिनिधी): करमाळा येथील रहिवासी असलेले परंतु सध्या मुंबई येथे फिटनेस अक्याडमी चालवणारे विक्रमवीर महेश वैद्य करमाळा येथे लवकरच हॅपी माईंड हॅपी हेल्थचे धडे देणार असल्याची माहिती महेश वैद्य यांनी दिली आहे.

करमाळा ही माझी मायभूमी आहे या मातीशी व इथल्या माणसांशी माझे प्रेमाचे नाते जोडलेले आहे याची परतफेड करण्याची संधी मिळाली आहे. मागील पंचवीस वर्षे मुंबई येथे फिटनेस अक्याडमी अविरत चालू आहे, सिने विश्वातील व उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती आज या फिटनेस अक्याडमी मध्ये आनंदी जीवनासाठी व आरोग्यासाठी कार्यरत आहेत.

 

कोरोना महामारीने सर्व जगभर थैमान घातले आहे माणूस पूरता हादरून गेला आहे त्यामुळे लोकांना आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज वाटत आहे. रोज आरोग्यासाठी पंचेचाळीस मिनिटे देणे ही गरज निर्माण झाली आहे.माणसाची रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी या कल्पनेचा निश्चितच फायदा होणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा.

व्यायाम हा प्रकार सर्वांना माहीत आहे तो कसा करावा किती करावा याची सांगड घालणे आवश्यक आहे.

 

त्यासाठी योग्य व्यायाम व समतोल आहार गरजेचा आहे. यामध्ये दहा वर्षे ते सोळा वर्षे वयोगटातील मुलांमुलींचा शारीरिक व बौद्धिक विकास होत असल्याने या वयामध्ये योग्य व्यायाम आणि चांगले विचारांची गरज निर्माण झाली आहे. मुलांची शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी रोज पाऊनतास शारीरिक व्यायाम आवश्यक आहे.

तसेच चाळीशी ओलांडलेल्या महिला पुरुषांसाठी अनेक आजार होऊ लागले आहेत त्यामध्ये मधूमेह उच्च रक्तदाब हाडांची झीज होऊन अशक्तपणा येत असल्याने या व्याधींवर मात करण्यासाठी शरीर मजबूत ठेवून आनंदी मन असणे गरजेचे आहे. सोलापूर येथील इंडियन माॅडेल स्कूलचे चेअरमन अमोल जोशी यांचे संपूर्ण सहकार्य यासाठी लाभणार आहे.

 

या सर्वांचा विचार करून करमाळा येथे लवकरच आठ दिवसाचा आरोग्य जागृती मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

यासाठी करमाळा येथील विनोदकुमार गांधी, भाऊसाहेब फुलारी, संध्याताई ढोके, राजेंद्र जगताप, नाना रामनवमीवाले, चंद्रशेखर रामनवमीवाले यांनी सहकार्य करत आहेत. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

litsbros

Comment here