करमाळा

चिखलठाण येथे उजनीच्या पाण्यात दोन तरुण बेपत्ता; एकजण मुंबईचा असल्याची माहिती, गावकर्यांकडून शोध सुरु

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

चिखलठाण येथे उजनीच्या पाण्यात दोन तरुण बेपत्ता; एकजण मुंबईचा असल्याची माहिती, गावकर्यांकडून शोध सुरु

करमाळा (प्रतिनिधी): तालुक्यातील उजनीच्या काटावर चिखलठाण येथे दोघेजण पाण्यात बेपत्ता झाले आहेत. शुक्रवारी (ता-14) सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

यातील एकजण हा मुंबई येथील असल्याचे समजत आहे. हे दोघे सकाळी उजनीकाटी फिरण्यासाठी गेले होते. यातील एकजण हा मच्छिमार आहे. मुंबईतील तरुणाने पोहण्यासाठी उडी मारली मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्याला काढण्यासाठी दुसर्याने उडी घेतली असे समजत आहे.

दोघेही पाण्यात बेपत्ता झाल्याचे समजताच गावकर्यांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. त्यासाठी नदीकाठी गर्दी केली आहे. करमाळा पोलिसही घटनास्थळी दाखल होत आहेत.

करमाळा तालुक्यात आ.शिंदे गटावर लोकांचा वाढता विश्वास; बागल गटासह पाटील गटाला ही गळती सुरुच; अभ्यासू नेते ऍड.अजित विघ्ने यांचा आ.शिंदे गटात प्रवेश

litsbros

Comment here