करमाळा

जिल्हा परिषद शाळा पाथुर्डी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिल्हा परिषद शाळा पाथुर्डी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

 केम (प्रतिनिधी): संजय जाधव- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथुर्डी या ठिकाणी सोशल डिस्टनचे पालन करून राजमाता जिजाऊसाहेब जयंती. स्वामी विवेकानंद जयंती व सोलापूरचे चार हुतात्मे स्मृती दिन साजरा करण्यात आला .यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन उपाध्यक्ष सदाशिव तोडेकर, सदस्य अतुल वैद्य, तानाजी मोटे, समाधान खरात, मुख्याध्यापक महेश्वर कांबळे, कानडे आजोबा, उपशिक्षिका सुरेखा चौरे, कविता कांबळे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळीज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ते जिजाऊ साहेब जयंती सप्ताहानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले होते .त्याचे बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील मोजकेच विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी माॅं जिजाऊसाहेब .स्वामी विवेकानंद यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले .यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन अध्यक्षा मीनाताई मोटे. उपाध्यक्ष सदाशिव तोडेकर .सदस्य अतुल वैद्य. समाधान खरात. मनीषा मोटे. मीराबाई बंडगर. माजी सरपंच बाळासाहेब मोटे. माजी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुरेश (आण्णा) मोटे.

माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य बाबीर वाघे .चव्हाण साहेब आदी उपस्थित होते .यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षाचे रोपण ही करण्यात आले. शाळेमध्ये झालेल्या रांगोळी स्पर्धा .चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा. वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेचे वितरण विद्यार्थ्यांना लेखणीचे बक्षीस देऊन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य ध्यापक महेश कांबळे यानी केले व आभार हि त्यांनी मानले.

litsbros

Comment here