करमाळाराजकारण

करमाळा शहरातील ‘या’ रस्त्याच्या कामाचा जयवंतराव जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरातील ‘या’ रस्त्याच्या कामाचा जयवंतराव जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

करमाळा (प्रतिनीधी): मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्वच रस्ते पक्के डांबरीकरण होणार आहेत. निम्म्यापेक्षा अधिक रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. आज भवानी नाक्यावरील शिवाजी पुतळा ते साठेनगर रस्त्याचा शुभारंभ पार पडला.

करमाळा शहरातील प्रमूख रस्त्यांपैकी एक असलेल्या भवानी नाक्या वरिल शिवाजी पुतळा ते साठे नगर डांबरीकरणाचे भूमिपुजन मा .आ. जयवंतराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या नविन डांबरीकरणामुळे शहरातील प्रमुख बाजार पेठांपैकी भवानी पेठ, गुजर गल्ली व मेन रोड आदींना जोडणारे रस्ते पक्के होणार आहेत.

त्यामुळे शहरांतर्गत रहदारी सुरळीत होणार आहे. जवळपास शहरातील ६०% रस्ते पक्के बनवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उरलेल्या रस्त्यांचेही काम लवकरच सुरु होईल अशी माहिती नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी दिली. यावेळी करमाळा शहराचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष वैभवराजे जगताप , उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी , माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, माजी नगराध्यक्ष जयराज चिवटे, माजी शिक्षणमंडळ सभापती पिंटूशेठ कटारिया,नगर सेवक डॉ मनोज कुंभार, नगरसेवक अतुल फंड , माजी नगरसेवक सुरेश इंदुरे , प्रसिद्ध व्यापारी पिंटूशेठ गुगळे ,अमोल जाधव , प्रविण ओहोळ , भैय्या

राठोड,ज्योतीराम ढाणे , गणेश राखुंडे ,जाफर घोडके , केतन इंदुरे , अक्षय जाधव , माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी , ख्वाजा कुरेशी , उदयोजक रमेशभाऊ वीर ,तनाजी कुकडे ,अतुल देवकर , उदयोजक बाळासाहेब बलदोटा , अमेय परदेशी, रामदास कुंभार, दिगांबर रासकर, पत्रकार आश्पाक सय्यद, सचिन अब्दुले सर, पत्रकार सचिन जव्हेरी , बाळासाहेब कांबळे, अलिम बागवान,शहाजी शिंगटे, विकास फंड, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी व ठेकेदार उपस्थित होते .

रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी:तुमच्या रेशनकार्डवरील ही माहिती चुकीची असेल, तर तुम्हाला होऊ शकते शिक्षा

आदिवासी समाजातील पोलीस उपनिरीक्षकास जातीवाचक शिविगाळ करणा-या पोलिस निरीक्षकावर कारवाई करा;

 

litsbros

Comment here