राज्य सरकारने दिंडीला परवानगी द्यावी; करमाळा तालुक्यातील आलेश्वरच्या महाराजांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
करमाळा (प्रतिनिधी) ; महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीला महाराष्ट्रतील महाआघाडी सरकारने यंदाच्या वर्षी पंढरपूरला जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी विश्व वारकरी संप्रदाय परांडा तालुका अध्यक्ष तसेच आलेश्वर येथील रहिवासी ह भ प पांडुरंग उर्फ तात्या महाराज यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात तात्या महाराज यांनी म्हटले आहे की महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीला महाराष्ट्र शासन का परवानगी देत नाही असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला असून त्यांनी पुढे असे म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात सर्व व्यवहार व दुकाने यांना महाराष्ट्र शासन परवानगी देते मात्र महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या पंढरपूर येथील कुलदैवत विठोबा यांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांना नाहक वेठीस धरले जाते.
ही गंभीर बाब आहे महाराष्ट्र शासन असा दुजाभाव का करतो असा सवालही त्यांनी उपस्थित केला वारकऱ्यांची संप्रदाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरला राज्यातील महा आघाडी सरकार अशा पद्धतीने पंढरपूर येथे वारकर्यांना जाऊ देत नसेल तर ही हुकूमशाही म्हणावी लागेल.
तेव्हा शासनाने याचा पुनर्विचार करावा व राज्यातील प्रमुख दिंडी प्रमुखांची बैठक तातडीने मंत्रालयात बोलावून यावर तोडगा काढावा मात्र फक्त एसटी बसने वारकऱ्यांच्या दिंडीना परवानगी न देता पायी दिंडी याला शासनाने परवानगी द्यावी.
यामध्ये परवानगी देताना कोरोना चे सर्व नियम तंतोतंत पाळावे असा आदेश पायी दिंडी देत असताना शासनाने काढावा याचे राज्यातील सर्व दिंडी प्रमुख तंतोतंत शासनाच्या नियमाचे पालन करतील.
तेव्हा राज्यातील ठाकरे सरकारने त्वरित पंढरपूर येथे पायी दिंडी जाण्यास वारकऱ्यांना परवानगी द्यावी व वारकऱ्यांचा दुवा घ्यावा अशी मागणी शेवटी आलेश्वर येथील महाराज ह भ प पांडुरंग तात्या सुरवसे यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.
Comment here