करमाळाक्राइम

करमाळा नगरपालिकेच्या कामाची चौकशी करून मुख्याधिकारी पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- नागेश कांबळे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा नगरपालिकेच्या कामाची चौकशी करून मुख्याधिकारी पवार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- नागेश कांबळे

करमाळा – नगरपालिकेद्वारे केलेल्या कूंभार ओढा येथील पूलाला संरक्षक कठडे नसल्याने आलेल्या पावसाच्या पाण्याने ओढ्याला पूर आल्याने सूर्यकांत मंडलिक हे वाहून गेले व त्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला तदनंतर त्यांचा मृतदेह शोधण्यात व नंतर देखील जी चालढकल व असंवेदनशीलता दर्शविली ती पाहता आपल्या कर्तव्यात जाणूनबूजून कसूराई केल्यानेच मयत मंडलिक यांचा मृत्यु झाला असून त्यांच्यावर सदोष मनूष्यवधाचा गून्हा दाखल करता येईल का?

याची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी अशी जोरदार मागणी रिपाई (आ) पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे
वास्तविक पाहता सदरिल पूलाच्या कठड्यासंदर्भात व त्यातून उदभवणा-या संभाव्य धोक्याबाबत विविध वृत्तपत्र तसेच मिडीयातून बातम्या देखील आल्या होत्या,तरीहि दखल घेतली गेली नाही तसेच मयत सूर्यकांत मंडलिक हे वाहून गेल्यावर देखील त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न घेतला गेला नाही परिणामी मंडलिक यांचा मृत्यु झाला तसेच मृतदेह शोधताना देखील विलंब लावला गेला.

सामाजिक कार्यकर्ते यांचे मदतीने नागेश कांबळे यांनी स्वतः त्या ओढ्यात उतरून शोधमोहीम राबवल्याचे सोशल मिडीयाद्वारे लाईव्ह शहर व तालूक्याने प्रत्यक्ष पाहिले आहे यामध्ये पालिकेचा सहभाग अतिशय नाममात्र होता एका नागरिकाच्या जीवाविषयी एवढी असंवेदनशीलता,तसेच आपत्कालीन कायदा लागू असताना देखील मा मूख्याधिकारी यांनी कर्तव्यात कसूराई केल्याने मयत मंडलिक यांना प्राण गमवावे लागले व आज त्यांचे

कूटूंब उघड्यावर आले आहे. अशातच मयतीनंतर देखील मदतीस प्रशासन सरसावले नाही याला कारणीभूत मूख्याधिकारी पवारच जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मधूष्यवधाचा गून्हा दाखल होईल का याची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमूख्यमंत्री अजित पवार, केंद्रिय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री भरणे, अनुसूचित जाती जमाती कमिशन , मा जिल्हाधिकारी, मा तहसीलदार यांना पाठवण्यात आले आहे. 

litsbros

Comment here