आरोग्यकरमाळा

करमाळा शहरात क्रमवार लसीकरण सुरू – टोकन क्रमांक 1 ते 92 क्रमांकाच्या नागरिकांना उद्या दिली जाणार लस

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरात क्रमवार लसीकरण सुरू – टोकन क्रमांक 1 ते 92 क्रमांकाच्या नागरिकांना उद्या दिली जाणार लस

करमाळा नगर परिषदेमार्फत 45 वय वर्षावरील नागरिकांची लसीकरण नोंदणी खोलेश्वर मंदिर किल्ला वेस येथे करण्यात येते. लसीकरणासाठी नोंदणी नुसार नागरिकांना टोकन क्रमांक दिले जातात. टोकन क्रमांक 1 ते 92 क्रमांकाच्या नागरिकांना दिनांक 27 मे 2021 रोजी कॉटेज हॉस्पिटल येथे लस देण्यात येणार आहे. तरी टोकन क्रमांक 1 ते 92 च्या नागरिकांनी लसीकरणाकरिता सकाळी 9:00 वाजता कॉटेज हॉस्पिटल येथे उपस्थित रहावे.

सध्या लसीकरणासाठी करमाळा नगर परिषदेकडून एकूण 627 नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांना यांच्या टोकण क्रमांकावरून टप्प्याटप्प्याने लसीच्या पुरवठ्या नुसार लसीकरणासाठी बोलविण्यात येईल. टोकण क्रमांकावरून कोणत्या दिवशी लसीकरणासाठी कॉटेज हॉस्पिटल येथे यावे याबाबत मोबाईल द्वारे फोन करून, शहरात अनाउन्सिंग करून तसेच वृत्तपत्रात बातमी देऊन नागरिकांना कळविण्यात येईल.

नागरिकांनी आपला क्रमांक ज्या दिवशी आहे त्याच दिवशी लस घेण्यास जावे इतर दिवशी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये
लसीचा प्रथम डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांनी करमाळा नगरपरिषद कार्यालय येथील नोंदणी कक्षात सकाळी 10:00 ते 12:00 या कालावधी मध्ये दुसरा डोस घेण्यासाठी नोंदणी करावे.
लस उपलब्धतेनुसार क्रमवार लसीकरण केले जाईल तरी दिनांक 27 मे रोजी फक्त टोकन क्रमांक एक ते 92 क्रमांकाच्या नागरिकांनीच लस घेण्यासाठी यावे. लसीकरणासाठी येतांना जेवन किंवा नाष्टा करून येणे गरजेचे आहे.

आधारकार्ड किंवा ईतर सर्व माहीती देणारे ओळखापञ,मोबाईल नंबर सोबत ठेवावा.फ्रंटलाईन वर्कर यांनी आधार कार्ड किंवा सर्व माहीती देणारे ओळखपञ,कार्यालयाचे ओळखपञ,वरीष्ट कार्यालयाचा कर्मचारी ओळख फाँर्म सोबत ठेवणे आवश्यक आहे.
दुसरा डोस करीता येणार्यांचे पहिला डोसकरीता 84 दिवस पुर्ण असणै गरजेचे आहे.
सर्व नागरीकाःना टप्प्या टप्प्याने लसीकरण उपलब्ध होणार आहे तरी नागरीकांनी प्रशासनास सहकार्य
सहकार्य करावे असे अवाहन मा. वीणा पवार मुख्याधिकारी करमाळा नगर परिषद यांनी केले आहे.

litsbros

Comment here