करमाळामनोरंजन

नृत्यकलेचा ध्यास व्यक्तीमत्वाला सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवतो- सहायक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

नृत्यकलेचा ध्यास व्यक्तीमत्वाला
सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवतो- सहायक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी

करमाळा/ प्रतिनिधी
नृत्यकला आपल्याला अनेक गोष्टी शिकवते किंबहुना आयुष्य कसे जगायचे हे शिकवते,आपले व्यक्तिमत्व घडवते,अभिनयसंपन्न, सुशिक्षितच नव्हे, तर सुसंस्कृत बनवते. भारतीय नृत्यकलेची हीच तर खासियत आहे,
असे प्रतिपादन युथ आयकाॅन सहायक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी यांनी केले ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
करमाळा येथील ब्ल्यू स्टार डान्स अकॅडमीने कोरोना चे नियम पाळून आॅनलाईन नृत्य स्पर्धा घेतल्या होत्या.

दोन गटात घेतलेल्या या ऑनलाईन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सदर स्पर्धेचा बक्षीस समारंभ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यशकल्याणी सेवाभवन करमाळा येथे पार पडला.यावेळेस बोलताना
यशकल्याणीचे मा.श्री.गणेशभाऊ करे-पाटील म्हणाले की,नृत्य करणे म्हणजे केवळ हात पाय हलविणे नव्हे, तर त्यामागे सखोल अभ्यास असावा लागतो. नृत्यासोबत मुख्य आहे तो अभिनय, मंचावर, नदी, झाड, आकाश, समुद्र नसताना तो आहे असा भास निर्माण करून द्यायला, उच्च कोटीच्या अभिनयाची गरज असते.यावेळेस डॉ.सौ.वर्षा करंजकर,डॉ.सौ. कविता कांबळे यांनी सर्व स्पर्धकांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले.


शिक्षक नेते व कुशल उद्योजक श्री.सुनीलजी कदम सर,कल्पवृक्ष महिला पतसंस्थेचे चेअरमन श्री.अक्षय मंडलेचा, सचिव सौ.सविता जाधव,सामाजिक कार्यकर्ते श्री.सचिन अब्दुले सर, ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.
लहान गटात चि.समर्थ कुलकर्णी व चि. यश कोरे (प्रथम),कु.संघमित्रा कांबळे व कु. हिंदवी जानभरे(द्वितीय),कु.स्वरा सूर्यवंशी(तृतीय) ,चि.स्वराज कांबळे (उत्तेजनार्थ) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

मोठ्या गटात श्री.अमित शेख (प्रथम), श्री.रोहित मेहता व श्री.केदार वाघमारे(द्वितीय), कु.दिव्या जाधव (तृतीय),श्री.समीर मेश्राम(उत्तेजनार्थ) यांनी बाजी मारली. सर्व विजेत्यांना प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अकॅडमी चे संचालक श्री.अक्षय कांबळे सर यांनी केले. श्री.अमोल कोरे यांनी आभार प्रदर्शन केले.

litsbros

Comment here