करमाळ्यात आपत्ती व्यवस्थापनाचे वाजले बारा; बहुजन क्रांती मोर्चाचा आंदोलनाचा इशारा
करमाळा दि.२८
(प्रतिनिधी)
सध्या पावसाचे दिवस सुरु असून विविध ठिकाणी झाडे पडणे, दरड कोसळणे, वीज पडणे अश्या घटना घडत आहेत.
अशात आपत्ती व्यवस्थापाणाची जबाबदारी प्रशासनावर असताना करमाळा तालुक्यातील रावगाव गावामध्ये रविवारी पाहटे कलीम शेख यांच्या घरावर सूबाभूळाचे झाड पडले असून ते काढण्यासाठी कलीम शेख यांनी ग्रामपंचायत रावगाव व पंचायत समिती करमाळा प्रशासनाला लेखी कळूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने कलीम शेख यांनी बहुजन क्रांती मोर्चाकडे धाव घेतली असता आज बहुजन क्रांती मोर्चा कडून तहसीलदार आणि गटविकास अधिकार यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे कि, कलीम शेख यांच्या घराशेजारी सुबाभळीचे ७० ते ८० फुट उंच जुनी ७ ते ८ झाडे आहेत. सदर झाडे धोकादायक झाली असून ते कधीही पडण्याची श्यक्यता आहे. सध्या एक झाड पडले असून त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही.
शेख कुटुंबाला जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली नाही. मागील दोन दिवसापासून पडलेले झाड काढण्यात आलेले नाही अथवा इतर धोकादायक झाडे तोडण्यात आलेले नाहीत.
कलीम शेख सारख्या सर्व सामान्य लोकांच्या विनंतीकडे प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही हि खूप दुर्दैवी बाब आहे.
सदर झाडे पडून जीवित व वित्तीय हानी होण्याची दाट श्यक्यता निर्माण झाले आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही न केल्यास बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलनाच इशारा देण्यात आला आहे.
यावेळ बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक आर. आर. पाटील, दिनेश माने, संतोष शिंदे, गौतम खरात, शहाबुद्दीन शेख, कय्युम शेख, कलीम शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Comment here