..तो खून अनैतिक संबंधातून; अवघ्या 24 तासात करमाळा पोलिसांनी लावला तपास

..तो खून अनैतिक संबंधातून; अवघ्या 24 तासात करमाळा पोलिसांनी लावला तपास

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा अहमदनगर या राष्ट्रीय महामार्ग वर काही दिवसापूर्वी एका कारमध्ये जळालेला तरुणाचा मृतदेह आढळला होता.

याबाबत करमाळा पोलिसांनी सदर घटनेचा तपास 24 तासाच्या आत करून सदर घटनेतील आरोपीवर करमाळा येथील पोलीस स्टेशनला पुन्हा नोंद करण्यात आला आहे वर मांगी येथील कुकडी कॅनलजवळ एका कारमध्ये अडळून आलेल्या गाडीतील एकाचा मृत्यूदेह हा खूनच असून यामध्ये तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

सुनिल घाडगे, त्याची पत्नी व भाऊ असे हे तिन संशयित आहेत. श्रावण रघुनाथ चव्हाण (वय ३८, रा. अडसुरे, ता. येवला, जि. नाशिक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

करमाळा पोलिसांनी याचा २४ तासाच्या आत तपास करुन गुन्हा दाखल केला असून एकजण ताब्यात घेतला असल्याची माहिती मिळत आहे. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मिठू जगदाळे हे करत आहेत. अनैतिकसंबंधातून हा खून झाला आहे. खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हा मृतदेह येथे आणला असावा असा संशय आहे.

 पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे. संबंधित खून झालेल्या व्यक्तीची येवला ग्रामीण पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद झाली होती.

 त्यानंतर याचा तपास सुरु होता. दरम्यान करमाळा ते नगर महामार्गावरील मांगी येथील कुकडी कॅनेलजवळ एक कार उभा होती. त्यात जळलेल्या अवस्थेत हा मृतदेह अढळून आला होता. 

सरकारी पंच म्हणून लिपीक रमीझ शेख, कालवा चौकीदार दत्तात्रय गोडगे यांनी काम पाहिले करमाळा पोलिसांनी 24 तासाच्या आत सदर गुन्हा उघडकीस आल्याने करमाळा पोलिसाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line