एनडीए साठी निवड झालेल्या मानव प्रशांत हेळकरचा झरे येथे सत्कार
उमरड(प्रतिनिधी) ता २९: श्री भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे येथे मानव प्रशांत हेळकर याची NDA मध्ये ६९ व्या क्रमांकाने निवड झाल्याबद्दल सत्कार पोलीस उपनिरीक्षक सागर कुंजीर यांचा हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. हरिदास डांगे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन यशकल्याणी सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटिल उपस्थित होते.
या कार्यक्रमास मा. उपसभापति विलासराव पाटील, प्राचार्य जयप्रकाश बिले, प्रा. राजेश शिंदे.,प्रशांत हेळकर, संदीप कोठारी, सरपंच भारत मोरे, उपसरपंच पोपट घाडगे, भिमराव घाडगे उपस्थित होते.
या कार्यक्रमास मानव हेळकर यांनी मुलांना संबोधित करताना सांगितले की, मुलानी पाचवी पासूनच आपले ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या दृष्टीने प्रयत्न करावे. सागर कुंजीर यांनी NDA मधील निवड अत्यंत स्पर्धात्मक असून, देशाच्या संरक्षणासाठी मानव हेळकर याची निवड करमाळा तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.
विद्यार्थिनी त्याचा यशाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा. मा. करेपाटील यांनी मानव याचा यशाचे कौतुक केले. बुद्धिमत्तला व बुद्धिवंतचे कौतुक केले पाहिजे. कार्यक्रमाचा अध्यक्षीय भाषणात डांगे साहेबांनी मानव हेळकर यांचा यशाबद्दल अभिनंदन केले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव युवराज बिले, संचालिका डॉ स्वाती बिले, मुख्याध्यापक दादासाहेब खराडे व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होता. या समारंभाचे औचित्य साधून श्री भैरवनाथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले याचा अभीष्टचिंतन सोहळा या ठिकाणी पार पडला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. नंदकिशोर वलटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश कोंडलकर यांनी केले.
Comment here