करमाळाक्राइम

पिकअपने उडवलेल्या मोटारसायकल वरील झरे येथील महिलेचे अखेर हॉस्पिटलमध्ये निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पिकअपने उडवलेल्या मोटारसायकल वरील झरे येथील महिलेचे अखेर हॉस्पिटलमध्ये निधन

करमाळा(प्रतिनिधी) ; सध्या करमाळा तालुक्यातील झरे येथे राहावयास असणारे पोपट नारायण गायकवाड हे आपल्या आजारी पत्नीला उपचारासाठी डॉ सुराणा यांच्याकडे मोटारसायकल(MH 45, AB 3406) वरून दिनांक 3 जून रोजी सकाळी साडे दहा वाजता घेऊन चालले होते. तेव्हा करमाळा-टेम्भुर्णी रोडवर एचपी पेट्रोल पंपासमोर एका पिकअपने(MH 13, DQ 6663) पाठीमागून धडक देऊन त्यांना उडवले. यात मोटारसायकल वरील गायकवाड पतिपत्नी गंभीर जखमी झाले.

या अपघातात गायकवाड यांच्या पत्नीला अधिक उपचारासाठी बार्शीला नेले होते. अपघात गंभीर असल्याने इजा मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्याने उपचार सुरू असतानाच गायकवाड यांच्या पत्नीचे निधन झाले.

याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून करमाळा पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.

litsbros

Comment here