करमाळा

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन झाले बंद

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन बंद

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी/ उन्हाळी आवर्तन 19 मे 2021 रोजी बंद करण्यात आले असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन 27 जानेवारी 2021 रोजी सुरू झाले होते. हे आवर्तन सलग 112 दिवस चालले. 14 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेचा मुख्य कॅनॉल कुंभेज या ठिकाणी फुटला होता.

त्यामुळे कॅनलचे दुरुस्ती कामांमुळे रब्बी आवर्तन सुरू करण्यास उशीर झाला. त्यामुळे यावर्षी प्रथमच रब्बी व उन्हाळी ही दोन्ही आवर्तने सलगपणे देण्यात आली. ही दोन्ही आवर्तने एकत्रित देण्यात आल्यामुळे प्रत्येक गावाला एकाच वेळेस दोन्ही आवर्तनाचे पाणी देण्यात आले.

हेही वाचा- आमदारांवर टीका करणाऱ्या सभापती साहेबांनी कोरोना काळात कोणाला काय मदत केली.? आणि कोणते काम केले.? हे जरा जनतेला सांगावे; पंचायत समिती सदस्य प्रतिनिधीची टीका

करमाळयात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 14 दुकानांवर कारवाई तर एक दुकान सील; वाचा सविस्तर

या आवर्तनाचा फायदा योजनेतील सर्व 24 गावांना झालेला असून शेवटच्या टप्प्यात तांत्रिक बिघाड आदी कारणामुळे योजना 10 दिवस बंद राहीली.त्याचा परिणाम म्हणून हेडच्या गावांना दुसऱ्या टप्प्यातील पाणी मिळू शकले नाही.

litsbros

Comment here