करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावची कन्या अशलेशाची छत्तीसगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावची कन्या अशलेशाची छत्तीसगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड


वाशिंबे(प्रतिनिधी) ; वाशिंबे ता. करमाळा येथील अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 11वी ( विज्ञान) शाखेत शिकणारी अशलेशा बागडे हिची छत्तीसगढ ( रांची ) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.

तिच्या निवडीबद्दल अभिनव शिक्षण संकुलाचे अध्यक्ष आबासाहेब झोळ व संस्था सचिव महादेव झोळ सर संस्था प्राचार्य रणजित कादगे सर, प्रा. पंकज शिंदे, प्रा. यशवंत पवार सर, प्रा.मंगेश साखरे प्रा. उमेश सांगळे,प्रा.दामाजी शेळके, यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अशलेशा ही श्री राजेश्वर विद्यालय येथे कार्यरत असणाऱ्या बागडे सर यांची कन्या आहे. अशलेशा हिने शिक्षणाबरोबरच आपली कुस्तीची आवड जोपासली. तिच्या या आवडीला प्रेरणा देण्याच काम खर्‍या अर्थाने तिचे कुटुंब व शिक्षकांनी केल आहे.

litsbros

Comment here