करमाळा : मतदान शांततेत पार पडले आता प्रतीक्षा निकालाची

करमाळा : मतदान शांततेत पार पडले आता प्रतीक्षा निकालाची

केत्तूर (अभय माने) विधानसभेसाठी बुधवार (ता.20) रोजी सकाळी चालू झळके मतदान सायंकाळी पर्यंत शांततेत पार पडले.मतदानापूर्वी काही ठिकाणी मतदारांना जेवणावळीचा स्वादही प्राप्त झाला.गेली महिनाभर सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार (ता.18) रोजी संपल्यानंतर बुधवार रोजी मतदार राजा हा मतदान करण्यासाठी सकाळपासून रांगेत उभा राहून मतदान करीत होता.

करमाळा मतदार संघात संजयमामा शिंदे, नारायण पाटील, दिग्विजय बागल, रामदास झोळ यांच्यात अतिशय अटीतटीचा चौरंगी सामना झाला आहे.प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्यामुळे उमेदवारांची मतदारांच्या घरोघरी पोचण्यासाठी अगदी सर्व नातेवाईक धावपळ करीत होते, यामध्ये मात्र अनेकांची दमछाक झाल्याचे दिसून येत होते. प्रचारात यावर्षी सोशल मीडियाने मोठा वाटा उचल्याचे प्रकर्षाने दिसून आले.

हेही वाचा – परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने राजुरीत रक्तदान शिबिर

खतरनाक फ्रॉड..! तुमच्याच बँक खात्यात पैसे पाठवून अशा प्रकारे तुमचीही होऊ शकते फसवणूक!

तरुण तुर्कासह ज्येष्ठांनी व महिलांनी केलेल्या मतदानामुळे उमेदवारांचे भवितव्य मात्र ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे.यामुळे उद्या 23 तारखेला कोण निवडून येणार कोण येणार याविषयीचा अंदाज जो तो आपापल्या पद्धतीने बेरीज वजाबाकी करून आकड्यांची जुळवा जुळवी करू लागला आहे. यामुळे विधानसभेचा निकाल शनिवार (दि.23) रोजी होणार असला तरी प्रत्येकाच्या काळजाची धड धड मात्र वाढवणारी ठरणार आहे.

karmalamadhanews24: