करमाळासोलापूर जिल्हा

लोकांची वीज कनेक्शन तोडणे बंद करा; करमाळा तहसीलदार यांना निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लोकांची वीज कनेक्शन तोडणे बंद करा; करमाळा तहसीलदार यांना निवेदन

करमाळा(प्रतिनिधी ) ;
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज तहसीलदार करमाळा यांच्या मार्फत राज्यपाल यांना वीज कनेक्शन बाबत विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी सदरचे निवेदन नायब तहसिलदार विजयकुमार जाधव यांनी स्वीकारले.

सदर निवेदनामध्ये म्हटले आहे कि, महाराष्ट्रामध्ये अनेक सरकार सत्तेवर येत असताना वीज बिल माफीची तसेच मोफत वीज देण्याचा नारा देऊन सत्तेवर येत असतात.

परंतु सत्तेमध्ये आल्यानंतर वीज बिलाच्या संदर्भामध्ये एक ही सरकार बोलताना दिसत नाही. या उलट सरकार सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये वीज शुल्क आकारून लुट केली आहे. त्यामध्ये शेतकरी असतील, घरगुत वीज असेल, व्यापारी असतील या सर्वांची लुट करत आहे.

चालू परस्थिती दिवाळी सुरु आहे आणि अशातच वीज तोडणी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे दिवाळी अंधारात होणार का? हा प्रश्न पडत आहे. किमान सणासुदीच्या काळात तरी सरकारने वीज कनेक्शन कापून जनतेचा अंत पाहू नये.

थकबाकीमुळे सुरु असलेली वीज कनेक्शन तोडणी तत्काळ थांबावावी अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे माढा जिल्हा प्राभारी आर आर पाटील, तालुका अध्यक्ष दिनेश दळवी, शहराध्यक्ष भीमराव कांबळे, बहुजन क्रांती मोर्चाचे गजानन ननवरे,

हेही वाचा – पोलीस भरतीत उंची वाढवण्यासाठी तरुणाने केली ‘ही’ आयडिया; चाणाक्ष सोलापूर पोलिसांनी मात्र पकडलेच

सरडे यांच्या राजीनाम्या नंतर ‘हे’ झाले करमाळा पंचायत समितीचे उपसभापती; वाचा सविस्तर

भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाकार्याध्यक्ष कय्युम शेख, गौतम खरात, शहाबुद्दीन शेख, जावेद मणेरी, संतोष शिंदे, दिनेश माने यांच्यासह पदाधिकार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

Comment here