करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

शिवसेनेचे आ.सावंत यांच्या करमाळा तालुक्यातील भैरवनाथ शुगर्स विरोधात ‘या’ मागण्यांसाठी होणार आंदोलन; मुख्यमंत्र्यांना निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील भैरवनाथ शुगर्स विरोधात ‘या’ मागण्यांसाठी होणार आंदोलन; मुख्यमंत्र्यांना निवेदन

करमाळा (प्रतिनिधी )भैरवनाथ शुगर विहाळ तालुका करमाळा या कारखान्याने सन 2018 19 मध्ये अनेक शेतकऱ्यांची 266 रुपये प्रमाणे अंतिम बिल दिले नाही त्याचबरोबर अनेक वाहनधारकांच्या नावावर त्यांच्या परस्पर काढलेले कर्ज प्रकरणी कारखान्याची चौकशी व्हावी तसेच शेअरच्या रकमा परत मिळाव्यात या मागणीसाठी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने 24 सप्टेंबर शुक्रवारी करमाळा तहसील कचेरीसमोर लाक्षणिक उपोषण व आंदोलन होणार आहे तरी या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की भैरवनाथ शुगर या कारखान्याने सन 2018 19 मध्ये उसाला 2200 रुपये भाव देतो असे आश्वासन दिले वृत्तपत्रातून तसा बातम्या प्रसिद्ध केल्या गाळप सुरू झाल्यानंतर दोन महिने उसाला 2200 भाव दिला मात्र नंतर शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ चालू केले अजूनही जवळपास दीड लाख मेट्रिक टन उसाचे प्रति टन 266 रुपया ने शेतकऱ्यांचे पैसे काढून ठेवले आहेत.

या पैशाला दोन वर्षे उलटून गेली तरी कारखाना प्रशासन शेतकऱ्याला दाद देत नाही दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना प्रचंड पैशाची गरज आहे कारखान्याचे चेअरमन आमदार तानाजी सावंत शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत तसेच या कारखान्याने अनेक वाहनधारकांच्या नावावर शेतकर्यांच्या परस्पर लाखो रुपयांचे कर्ज काढले आहे हे कर्ज थकीत झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वर बँकेचे नाव लागले असून संबंधित बँका वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देत आहेत.

शेतकऱ्यांची थकबाकीमुळे पण खराब झाल्यामुळे त्यांना पिक कर्ज याबाबत अन्यायग्रस्त शेतकरी कारखान्यावर विचारपूस करण्यासाठी गेल्यास त्यांना कर्मचाऱ्या कडून कारखान्याच्या गेटवर हाकलून दिले जाते त्याच प्रमाणे गेली दहा वर्षापासून शेअर्स म्हणून प्रत्येकी शेतकऱ्याकडून वीस हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

या रकमेला हा कारखाना व्याज देत नाही किंवा लाभांश देत नाही व ही रक्कम परत मागण्यास गेल्यास शेतकऱ्याला हुसकून लावले जाते या सर्व प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे

हेही वाचा- भिगवनचे रेल्वे फाटक ‘या’ दिवशी असणार मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद; रस्ते प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा वापर करा

सोलापूर-पुणे डेमो पँसेजर सुरू करण्याची मागणी

आमदार तानाजी सावंत यांनी एक तर शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत किंवा या सर्व प्रश्नांचा खुलासा उद्धव साहेब ठाकरे यांच्यापुढे मांडावा शी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.


सातत्याने साखर उतारा कमी दाखवून एफ आर पी कमी काढायची व शेतकऱ्यांचा ऊस कवडीमोल भावाने खरेदी करायचा असा प्रकार सातत्याने या कारखान्यातून होत असून याचीही चौकशी साखर आयुक्त पुणे यांनी करावी अशी मागणी केली आहे.

litsbros

Comment here