करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करा; आगारप्रमुखांना निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करा; आगारप्रमुखांना निवेदन

करमाळा(प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करा अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे तालुकाध्यक्ष रविंद्र वळेकर यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी करमाळा परिवहन आगर प्रमुख श्रीमती अश्विनी किरगत यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,साध्य तालुक्यातील शाळा-कॉलेज चालू झाले आहेत.सध्या सार्वजनिक परिवहन सेवा विस्कळीत झाली आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शाळा कॉलेजात जाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यां वाहतुकीसाठी एस टी विभागाने लवकरात लवकर नियोजन करावे अशी मागणी केली आहे.

हेही वाचा – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 60 कोटींचा निधी द्या- सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची पीडित

माहिती अधिकार कायद्याची १६ वर्षे; काय आहे वस्तुस्थिती; काय आहेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या भावना- वाचा विशेष लेख

यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा शहराध्यक्ष ऍड शिवराज जगताप,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गौरव झांझुर्णे,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,जिल्हा सरचिटणीस महेश मोरे,जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वाघमारे आदी उपस्थित होते.

litsbros

Comment here