करमाळाजेऊर

वाशिंबे ते भिगवण रेल्वे दूहेरीकरनाचे काम प्रगतीपथावर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वाशिंबे ते भिगवण रेल्वे दूहेरीकरनाचे काम प्रगतीपथावर

केतूर (अभय माने ) सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावर रेल्वे दूहेरीकरनाचे काम वेगाने सुरू असून भाळवनी ते वाशिंबे (ता.करमाळा) दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे 26.33 किलोमीटरचे काम 27 आँक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या यशस्वी चाचणीनंतर वेगाने सुरू आहे.

याच मार्गावरील अंतिम टप्प्यातील उर्वरित वाशिंबे ते भिगवण दूहेरीकरणाचे 29 किलोमीटरचे काम युध्दपातळीवर वेगाने चालू आहे.दूसर्या मार्गावरून रेल्वे चालू असताना काम बंद ठेवले जातआहे. गाडी गेल्यानंतर काम चालू केले जाते.

गाडी येण्याच्या आदी कामगारांना माहीती दिली जात आहे. हा परीसर ऊजनी लाभक्षेत्रात येत असल्यामुळे अनेक ठिकाणी भीमा नदीवर पूल बांधण्याचे काम चालू आहे. तर मातीचे भराव ही टाकण्यात आले आहेत.तरी मार्च 2022 पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दुहेरीकरणामुळे रेल्वे गाड्यांचा वेग निश्‍चितपणे वाढणार आहे. प्रवाशांना कमी वेळेत जास्त अंतराचा प्रवास करणे शक्‍य होईल.


छायाचित्र : वाशिंबे (ता. करमाळा ) नवीन रेल्वे रुळांवरती खडी टाकण्यासाठी मालवाहतूक टीपरला रेल्वेची चाके जोडली आहेत. त्यामध्ये मशीन व्दारे खडी भरून रुळांवर टीपरच्या सहाय्याने खडी टाकण्यात येत आहे. तर दुसर्या मार्गावरुन रेल्वे चालू असताना काम बंद ठेवले जात आहे. गाडी येण्याच्या आदी कामगारांना माहिती दिली जात आहे.

litsbros

Comment here