आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठ्ठीचार्जचा करमाळा भाविक वारकरी मंडळ कडून जाहिर निषेध: जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना निवेदन

आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठ्ठीचार्जचा करमाळा भाविक वारकरी मंडळ कडून जाहिर निषेध: जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना निवेदन

करमाळा (प्रतिनिधी);  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान (आळंदी)प्रसंगी लाठ्ठीचार्ज करण्यात आला. त्याचा आम्ही जाहिर निषेध करतो. ही बाब अतिशय निंदनीय आहे. हा वारकरी परंपरेवर घाव घालण्याचा प्रयत्न आहे. असे आम्ही कदापी होऊ देणार नाही.

त्याप्रसंगी जबाबदार असलेले अधिकारी व लाठ्ठीचार्ज करणारे सर्व पोलीस कर्मचारी तत्काळ निलंबित करण्यात यावे. वारकरी हे स्वयं शिस्त पाळणारे आहेत. लाठ्ठीचार्ज करणे हे पोलीस प्रशासनाने अपयश आहे. त्या परिस्थतीत हा पर्याय होऊ शकत नाही.

आत्ता पर्यंत असे कधीच घडले नाही. पोलिसांनी परिस्थिती हाता बाहेर जाऊ कशी दिली. संबंधीत अधिकारी व कर्मचारी तत्काळ निलंबित करण्यात यावे. वारी कालावधीत जे अधिकारी अनुभवी असतील तेच नियुक्त करण्यात यावेत. अन्यथा संपुर्ण महाराष्ट्र राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असे अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे कडून सुधाकर महाराज इंगळे ( राष्ट्रिय अध्यक्ष) यांनी स्पष्ट केले आहे.

असे निवेदन मा.मुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे देण्यात आले. तसेच सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उप जिल्हाधिकारी मा. शमा पवार मॅडम यांना लेखी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव), जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष) , मोहन शेळके ( प्रदेश सचिव ), संजय पवार (शहर अध्यक्ष), गुरुसिद्ध गायकवाड, ई. पदाधिकारी उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line