करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील वांगीचे युवक धावले पूरग्रस्तांच्या मदतीला; वस्तूंचे किट घेऊन कोल्हापूर,सांगली कडे रवाना

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील वांगीचे युवक धावले पूरग्रस्तांच्या मदतीला; वस्तूंचे किट घेऊन कोल्हापूर,सांगली कडे रवाना

करमाळा प्रतिनिधि :करमाळा तालुक्यातील वांगी येथील “गोविंद देशमुख फॅन्स क्लबचे युवक कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना झाले आहेत.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. कोकणामध्ये तर पावसाने हाहाकार माजवला आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांना महापूर आला होता. कोल्हापूर सांगली जिल्ह्यांतील पूरामुळे सगळीकडे मोठं नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले शिवाय शेतकऱ्यांची जनावरेही वाहून गेली आहेत. राज्यात दरड कोसळून अनेकांचा बळी गेला आहे.

आता पूर ओसरत असून त्याठिकाणी बचावकार्य सुरु आहे. या सर्व बाबींचा विचार करून आपणही समाजाचे देणे लागतो. याच भावनेतून गोविंद देशमुख फॅन्स क्लबचे सर्व सदस्य कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निघालो आहे. मदत म्हणून आम्ही किराणा किट, वेफर्स, बिस्कीट, पाणी तसेच प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन श्रमदान करणार आहोत, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांनी दिली आहे.

हेही वाचा-पूर आला आणि आगर व्यवस्थापक साडेसात लाखांची रोकड घेऊन ९ तास बसले एसटीच्या टपावर; कर्तव्यदक्षतेला सलाम.!

नर्सची आत्महत्या: सोलापूर महामार्गालगत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

यावेळी उपस्थित गोविंद देशमुख फॅन्स क्लब, वांगीचे अध्यक्ष विश्वजीत कदम, उपाध्यक्ष तुषार साळुंखे, कार्याध्यक्ष अजिंक्य देशमुख, श्रीराज देशमुख, गणेश शेळके, गोविंद देशमुख, प्रथमेश कदम, तुषार देशमुख, राकेश माने, निखिल पवार, मनोज पवार, ओंकार देशमुख, आशुतोष देशमुख, रोहित काशिद, संकेत पवार होते.

litsbros

Comment here