करमाळावांगी

वांगीत आ.शिंदे गटाची बाजी; पाटील गटाला धक्का

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वांगीत आ.शिंदे गटाची बाजी; पाटील गटाला धक्का

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील वांगी 1 मध्ये आमदार संजयमामा शिंदे गटाचे वर्चस्व असलेल्या मोहिते पाटील व पाटील गटाला धक्का बसला आहे.
वांगी नंबर 1 मध्ये निळकंठ देशमुख यांच्या पॅनेलचे विठाबाई भोसले, हरिभाऊ तकीक, अमोल दैन, सोमनाथ ढावरे, शुभांगी देशमुख, नरसिंग देशमुख, सुरेखा दिवटे व पाटील व मोहिते पाटील समर्थक गटाचे शहाजी देशमुख यांच्या पॅनेलचे दत्ता देशमुख, मनिषा गायकवाड, शुभांगी ढावरे व शारदा देशमुख हे विजयी झाले आहेत.

वांगी नं ३ मध्ये आमदार संजयमामा शिंदे व बागल गटाच्या युतीची एकहाती सत्ता आली असुन‌ पाटील गटाचा पराभव झाला आहे. वांगी नं ३ मध्ये मयुर महादेव रोकडे,चंद्रकांत लक्ष्मण कदम,शंकर भिमराव जाधव,रोहिणी सोमनाथ रोकडे,सुवर्णा संतोष कांबळे विजयी झाले आहेत.

जिल्हा परिषद वांगी गटामध्ये संजयमामा शिंदे गटाने व बागल गटाने चांगले यश मिळवले असुन वांगी गटात पाटील गटाला मात्र धक्का पोहचला आहे.

litsbros

Comment here