करमाळामुंबईसोलापूर जिल्हा

वडगाव येथील खाजा खान पठाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त मुंबई येथे सत्कार संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वडगाव येथील खाजा खान पठाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त मुंबई येथे सत्कार संपन्न

 

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील मूळचे वडगाव येथील स्थानिक रहिवासी व सध्या मुंबई येथे बेस्ट आगारांमध्ये वाहक म्हणून कार्यरत असलेले खाजा खान रहमान पठाण हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर २९ जुलै २०२२ शुक्रवार रोजी सेवानिवृत्त झाले.

त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त नुकताच वांद्रे बेस्ट डेपोत पठाण यांचा डेपोतील अधिकारी भालेराव यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला मूळचे वडगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेले श्री पठाण हे 1992 रोजी मुंबई येथील मुंबई महानगरपालिका परिवहन आगार मध्ये वाहक म्हणून कार्यास लागले.

अविरत परिश्रम जिद्द चिकाटी व आपल्या सेवेमध्ये प्रामाणिकपणा अशा पद्धतीने श्री खाजा खान पठाण यांनी गेली 58 वर्षे प्रामाणिकपणे व उत्कृष्ट पद्धतीने बेस्ट मध्ये कर्तव्य बजावून नावलौकिक मिळवले अशा या उत्कृष्ट कामगाराचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नुकताच बांद्रा या बेस्ट आगारामध्ये मोठ्या उत्साह मय वातावरणात पार पडला.

यावेळी बांद्रा बेस्ट डेपोतील अधिकारी कर्मचारी तसेच पठाण यांचे निकटवर्तीय कुटुंब हजर होते आपल्या सेवानिवृत्तीच्या अखेरच्या कार्यक्रमात बोलताना श्री पठाण म्हणाले की सदरचा हा माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कायमस्वरूपी माझ्या स्मरणात राहील असे ते सत्काराला उत्तर देताना शेवटी बोलताना पठाण म्हणाले.

litsbros

Comment here