केत्तूर नं 1 येथील प्रजीमा 125 रस्ता फोडल्याची तक्रार

केत्तूर नं 1 येथील प्रजीमा 125 रस्ता फोडल्याची तक्रार !

केत्तूर (प्रतिनिधी): केत्तूर नं 2- केत्तूर नं 1 हा रस्ता सार्वजनिक बांधकामकडे वर्ग असलेला रस्ता फोडल्याची तक्रार केत्तूर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागाकडे दिली आहे. 

याबाबत हकीगत अशी की, जलजिवन मिशन अंतर्गत केत्तूर नं 1 साठी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन चालू करण्यात आली आहे. परंतु संबंधित ठेकेदार याने जाणून बुजून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग असलेला रस्ता पोखलेन मशीनने फोडला आहे. 

व रस्त्यातून पाईप लाईन चारी चालू केली होती. परंतु ग्रामस्थांनी सदर चारी बंद करून संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवली आहे.   

  ” केत्तूर नं 2 ते केत्तूर नं 1 हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकडे वर्ग झाला असून भविष्यात या रस्त्याचे रूंदीकरण होणार. या आगोदर संबंधित ठेकेदारास तोंडी सांगतले होते. तरीही रस्ता फोडला आहे. याबाबत वरीष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. तक्रारीची योग्य ती दखल न घेतल्यास आंदोलन करणार आहे “. 

          -विजय येडे सामाजिक कार्यकर्ते, केत्तूर

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line