वाशिंबे येथे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत बैलपोळा सण उत्साहात साजरा

वाशिंबे येथे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत बैलपोळा सण उत्साहात साजरा

वाशिंबे (सचिन भोईटे):- करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने संचालक, उजनी‌ बॅक वॉटर पट्टातील प्रगतशील शेतकरी नवनाथ झोळ यांच्या दत्तकला फार्महाऊस वाशिंबे येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा केला गेला. शेतकऱ्यांसोबत वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा . करमाळ्याच्या पच्छिम भागात भाद्रपद अमावस्येला भादवी पोळा साजरा जातो. बैलांना स्वच्छ धुणे, रंगबेरंगी पाठिवर झुल घालते,

शिंगाडाना बेगड लावणे, डोक्याला बाशिंग, कवड्यांची गळ्यात माळ अशा पद्धतीने सजवून झोळ परिवार यांनी पुरण-पोळीचा गोड नैवद्य खाऊ घालत पुजा करुन बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत बैलपोळा सण साजरा केला.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line