करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
हिंगणी येथे श्री. भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले
करमाळा (प्रतिनिधी): भैरवनाथ प्रतिष्ठान, हिंंगणी आयोजित श्री गणेश उत्सव निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमा पैकी आज दिनांक २६/०९/२०२३ रोजी सर्वानुमते रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून रक्त दान करून सहकार्य केले.
या शिबिरामध्ये ८६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे काम श्री. कमला भवानी ब्लड सेंटर करमाळा यांच्याकडून घेण्यात आले होते.
प्रत्येक रक्त दात्यास एक पाण्याचा जार किंवा एक स्मार्ट वॉच असे बक्षीस देण्यात आले.
Comment here