बोअर मध्ये अडकलेली मोटर काढताना नेरले येथील शेतकरी भिमराव गोडसे यांचा मृत्यू
करमाळा (प्रतिनिधी); पावसाने लांबड लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, अशातच विहिरीवर काम करून पाणी पिकांना कसे देता येईल याचा विचार शेतकरी करत आहेत. अशातच बोर मध्ये अडकलेले मोटर काढून बोर पूर्ववत करण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यात बोर काढताना लोखंडी पाईप पडल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील नेरले या गावात विष्णू बनसोडे या शेतकऱ्याच्या शेतात बोरमध्ये मोटार अडकली होती.
बोर मध्ये अडकलेली मोटर काढण्यासाठी अण्णासाहेब गवळी यांची इलेक्ट्रिक कप्पी लावण्यात आली होती व मोटर काढण्याचे काम चालू होते. त्यासाठी पाईप वर काढले जात होते. तेव्हा कप्पी काढण्याच्या कामासाठी गवळी यांनी शेजारील शेतकरी भीमराव लाला गोडसे (वय 59) यांना बोलावून नेले होते.
पाईप वर काढताना तो पाईप मधून मोडून डोक्यात पडल्याने शेतकरी भीमराव गोडसे हे गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा प्राण गेला.