करमाळ्यात उद्या धनगर बांधवांची मोटारसायकल रॅली ; आरक्षण मुद्दा पेटणार !

करमाळ्यात उद्या धनगर बांधवांची मोटारसायकल रॅली ; आरक्षण मुद्दा पेटणार !

करमाळा (प्रतिनिधी): चोंडी ता.जामखेड येथे धनगर आरक्षण अमलबजावणी साठी उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातून उद्या शनिवार ऐवजी रविवारी सकाळी 9.30 वाजता दत्त मंदीर करमाळा येथून निघणार भव्य मोटार सायकल रॅली.

एस.टी.धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी.तसेच चौंडी येथे यशवंत सेनेचे समाज बांधव गेली आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असून देखील विद्यमान सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी अजून देखल दखल घेतली नसल्याची फार मोठी खंत आहे. त्या उपोषण कर्त्यांची तब्येत दिवसां दिवस ढासळत असून प्रशासन समाज बांधवांच्या जिवाशी खेळत आहेत. त्याच निषेधार्थ सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीने दिनांक १७ /९ /२०२३ वार:- रविवार रोजी जेऊर बाजार तळ येथून सकाळी ९:०० वाजता तर दत्त मंदिर काॅटेज येथून सकाळी ९:३० वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ होणार आहे. चौंडी येथे जाऊन करमाळा तालुक्याच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध पत्राद्वारे म्हटले आहे. चोंडी ता.जामखेड येथे धनगर आरक्षण अमलबजावणी साठी उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना जाहीर पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातून उद्या शनिवार ऐवजी रविवारी दि.१७ रोजी सकाळी ९:३० वाजता दत्त मंदीर करमाळा येथून भव्य मोटार सायकल रॅली निघणार आहे.

 सकल धनगर समाजाच्या वतीने करमाळा ते चौंडी भव्य मोटारसायकल रॅली काढून या सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थितीत राहाण्याचे आव्हान सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

karmalamadhanews24: