करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आली रंगत 18 जागेसाठी तब्बल 154 अर्ज मंजूर; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार, मग चित्र स्पष्ट..

करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आली रंगत 18 जागेसाठी तब्बल 154 अर्ज मंजूर; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार, मग चित्र स्पष्ट..

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा बाजार समितीचे निवडणुकीमध्ये आता चांगलीच रंगत आली असून माजी आमदार पाटील आता सर्व तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे याकरिता अकलूजच्या मोहिते पाटील यांनी बागल गट व पाटील गट एकत्रितरीत्या निवडणूक लढवावी असे संकेत दिल्याने सध्या तरी पाटील गट व बागल गटाची कोणतीच युतीची अधिकृत घोषणा झाली नसल्याचे दिसत आहे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दाखल झालेल्या १६१ अर्जांपैकी ६ इच्छुकांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. 

यामध्ये वालचंद रोडगे यांचे हमाल तोलार गटात एकाच ठिकाणी दोन अर्ज होते, त्यातील एक अर्ज राहिला आहे. विद्यमान उपसभापती चिंतामणी जगताप यांच्यासह सहा अर्ज नामंजुर झाले आहेत. १५४ अर्ज मंजूर झाले असून दिनांक 26 सप्टेंबर मंगळवार पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे 

मंजूर अर्जामध्ये सहकारी संस्थामध्ये सर्वसाधारण ५२, महिलामध्ये १५, ओबीसीमध्ये ९ व एनटीमध्ये ९ अर्ज आहेत. ग्रामपंचातमध्ये ६५ अर्ज आहेत. 

व्यापारीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे मनोज पितळे व परेशकुमार दोशी असे २ व सावंत गटाचे हमाल तोलारमध्ये १ अर्ज राहिला आहे. या जागा बिनविरोध झाल्याअसून अधिकृत घोषणा बाकी आहे.

सहकारी संस्था सर्वसाधारणमध्ये चिंतामणी जगताप, अशोक शेळके, नवनाथ दुरंदे, महेशराजे भोसले पाटील व ओबीसीमधून आनंद आभंग. ग्रामपंचायत एसीमधून बाळू पवार यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. 

बाळू पवार यांचा एक अर्ज मंजूर झाला आहे तर एक नामंजूर झाला आहे. नामंजूर झालेल्या त्यांच्या अर्जाला व सुहास ओहोळ यांना अनुमोद असलेल्या व्यक्तीची सही आहे म्हणून हा अर्ज नामंजूर झाला.

बाजार समितीतीची थकबाकी, बाजार समितीची मालमत्ता, शेतकरी असल्याचा दाखला नसने अशा कारणावरुन अर्ज नामंजूर झाले आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे यांनी काम पाहिले. 

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान उपसभापती चिंतामणी जगताप यांचा अर्ज नामंजूर झाला आहे. याविरुद्ध आपण अपिलात जाणार आहे, अशी प्रतिक्रिया उपसभापती जगताप यांनी बोलताना दिली आहे.

जगताप म्हणाले, करमाळा कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत दाखल केलेला माझा अर्ज बेकायदेशीररीत्या नामंजूर केला आहे. त्याविरुद्ध आपण कायदेशीरपणे अपिलात जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कोणाच्या दाबाखाली येऊन हा निकाल दिला आहे का? अशी शंका निर्माण होत आहे. 

माझ्या अर्जावरील निकाल काहीही आला तरी आमचे गटप्रमुख जो आदेश देतील तो मी पाळणार आहे. अपिलात अर्ज मंजूर होणारच असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून गटप्रमुखांनी मला अर्ज मंजूर झाल्यानंतर तो मागे घेण्यास सांगितले तरी अर्ज मागे घेणार आहे, असेही ते म्हणाले आहेत. 

या निवडणुकीत करमाळा तालुक्यातील जनतेच्या मनात जी सध्या बागल व पाटील गटाची युती आहे. ती युती होणार असून या युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत.

 शेवट हा निर्णय मतदारांच्या न्यायालयातच होणार आहे, असेही जगताप म्हणाले आहेत. माझा अर्ज नामंजूर झाला असला तरी बंधू प्रतापराव जगताप व राहुल जगताप यांचा अर्ज मंजूर झाला आहे, असेही ते म्हणाले आहेत.

एकंदर पाहता सध्यातरी बाजार समितीचे निवडणूक कमालीची चुरशीची ठरणार असून यामध्ये पाटील गट बागल गट जगताप गट अशा पद्धतीने गटागटामध्ये निवडणूक होणार आहे.

karmalamadhanews24: