केत्तूर येथील प्राचीन महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा भाविकांच्या गर्दीत उत्साहात संपन्न

केत्तूर येथील प्राचीन महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा भाविकांच्या गर्दीत उत्साहात संपन्न

केत्तूर (अभय माने) : करमाळा तालुक्यातील केत्तूर नंबर 1 येथील उजनी काठावरील प्राचीन महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा शेवटच्या सोमवारचे औचित्य साधून हभप नाना महाराज पांडेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

   यावेळी हर हर महादेव, जय किर्तेश्वर, बम बम भोले चा गजर करण्यात आला जयघोषाने वातावरण चैतन्यम वयी आनंदी बनले होते तालुक्यातील उजनीकाठावर वसलेले तेरावा चौदाव्या शतकातील हे प्राचीन,हेमाडपंती मंदिर आहे.

येथील ग्रामस्थांनी व भक्तांनी लोकवर्गणी व लोकसहभागातून मंदिराचा भाग स्वच्छ व सुंदर करून परिसराचा कायापालट केला आहे.

  कलशारोहण सोहळ्यानिमित्त संत तुकाराम महाराज यांची अकरावे वंशज कानोबा महाराज देहूकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 तत्पूर्वी कलशाची केत्तूर नंबर 1 व केत्तूर नंबर 2 येथील प्रमुख मार्गावरून ढोल ताशाच्या गजरात बैलगाडी मधून सवादय मिरवणूक काढण्यात आली होती. या सोहळ्याचा मान गावातील सासरी केलेल्या गावच्या लेकींना देण्यात आला.

 त्यांनीही या कार्यक्रमाला फुल ना फुलाची पाकळी अशी आर्थिक मदत केली.यावेळी या गावच्या लेकींचा सन्मानही श्री कित्तेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट केत्तूर यांच्या वतीने केला गेला.

 सोमवार उपवास असल्याने आलेल्या भाविकांना यावेळी खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले. दर्शनासाठी महिला मंडळाची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून येत होती.

 दुपारी एक ते सायंकाळी सात यादरम्यान मंदिरात महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले यावेळी मंदिरासमोर मंडप, फेक्टर ब्लॉक आदी कामे करण्यात आली आहेत.    1996 सॉरी या मंदिरात 13 कोटी नामजप यज्ञ करण्यात आला होता.

या नामजप यज्ञास करवीर पिठाचे तत्कालीन शंकराचार्य विद्या शंकर भारती यांची उपस्थिती लाभली होती. केत्तूरच्या श्री कीतेश्वर या देवस्थानचा उल्लेख काशीखंड तसेच शिवलीलाअमृत व योगवशिष्ठ या प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख पहावयास मिळतो.

karmalamadhanews24: