आजी आजोबांच्या लक्षणीय उपस्थितीत जि.प. शाळा पोथरे येथे ‘आजी-आजोबा दिन’ साजरा

आजी आजोबांच्या लक्षणीय उपस्थितीत जि.प. शाळा पोथरे येथे ‘आजी-आजोबा दिन’ साजरा

करमाळा(प्रतिनिधी); आजी आजोबांच्या लक्षणीय उपस्थितीत करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोथरे येथे ‘आजी-आजोबा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. विष्णु रंदवे यांनी भूषविले. प्रथम उपस्थित आजी – आजोबांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत शाळेतील शिक्षक श्री. कालिदास जाधव, श्री.बापू रोकडे , श्रीम. शाबिरा मिर्झा , श्रीम. स्वाती गानबोटे, श्रीम. सविता शिरसकर यांनी केले.

तर उपक्रमाचे प्रास्तविक, हा उपक्रम राबविण्यामागचा शासनाचा उद्देश आणि कुटूंबातील आजी – आजोबांचे महत्व याबाबत सविस्तर माहिती विषयशिक्षिका श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी यांनी उपस्थितांना आणि विद्यार्थ्यांना करून दिली.

मुख्याध्यापक श्री . गजेंद्र गुरव यांनी या उपक्रमामधे विद्यार्थ्यांची व आजी आजोबांची भूमिका याविषयी थोडक्यात माहिती दिली.

सर्व उपस्थित आजी – आजोबांचे पूजन शाळेतील विद्यार्थ्यांनी केले. यावेळी सर्व ज्येष्ठांचे डोळे पाणावले होते.

हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्व आजी आजोबांनी शासनाचे व शाळेचे मनापासून आभार मानले. विद्यार्थ्यांच्या अध्ययनामधे घरच्या घरी आम्ही सर्वोतोपरी आमची भूमिका बजावू असे अभिवचन आजोबा श्री. विष्णु रंदवे व श्री .विठ्ठल शिंदे यांनी दिले.

हा उपक्रम एवढा परिणामकारक ठरला की लगेचच काही वेळात त्याची फलश्रुती दिसून आली.

 

काही विद्यार्थी स्वप्रेरणेने बोलण्यासाठी समोर आले व आजपासून आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर राखून त्यांची तन -मन – धनाने सर्वोतोपरी सेवा करू, भविष्यात त्यांना कधीही दुखावणार नाही अशी ग्वाही दिली.

 

यामुळे सर्व आजी आजोबांनी या विद्यार्थ्यांवर खूश होऊन स्वागत करताना स्वतःस मिळालेले गुलाबपुष्प या विद्यार्थ्यांस देऊन त्यांचा सन्मान केला.

खरंच, हा उपक्रम राबवत असताना त्या कालावधीमधे काही क्षणांपुरती का होईना शाळेत भावूक वातावरण निर्मिती झाली होती.

 

शेवटी सर्व उपस्थितांचे आभार विषयशिक्षक श्री. दत्तात्रय मस्तूद यांनी मानले व अध्यक्षांच्या परवानगीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line