मराठा निषेध मोर्चाने करमाळा दणाणला, हजारोच्या गर्दीने नोंदविला तीव्र निषेध; मोर्चामध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने पाणी वाटप

मराठा निषेध मोर्चाने करमाळा दणाणला, हजारोच्या गर्दीने नोंदविला तीव्र निषेध; मोर्चामध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने पाणी वाटप

करमाळा (प्रतिनिधी); 

सकल मराठा समाज यांच्या वतीने आज काढण्यात आलेल्या भव्य अशा निषेध महामोर्चाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटा येथील मराठा आंदोलकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाज तसेच बहुजन बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने आज करमाळा शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून भव्य असा महामोर्चा काढण्यात आला होता.

 सदरचा महामोर्चा महात्मा गांधी पुतळा ते जय महाराष्ट्र चौक ते छत्रपती शिवाजी चौक ते सुभाष चौक ते आंबेडकर चौक ते सरळ तहसील कार्यालय अशा मार्गाने सदरचा महामोर्चा काढण्यात आला होता.

 या मोर्चामध्ये या सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा शब्दात सकल मराठा समाज बांधवांनी करमाळा शहर दुमदुमून सोडले होते या मोर्चामध्ये सकल मराठा समाज बांधवा बरोबर सकल मुस्लिम समाज तसेच बहुजन बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होती

भव्य महा निषेध मोर्चा ची समाप्ती अखेर करमाळा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाली.

 यावेळी करमाळा तालुक्यातील राजेश्वरी जगदाळे, वृषाली शेंडगे, संध्या रानी लबडे, सुप्रिया पवार, साक्षी आडेकर तसेच सायली साळुंखे या शिवकन्यांनी आपल्या मनोगतात शासनाचा तीव्र भाषेत निषेध केला.

यावेळी प्रांताधिकारी कुर्डूवाडी मॅडम यांना निवेदन देण्यात आले याचवेळी सानिका लावंड या शिवकन्याने निवेदन वाचून दाखविले याचवेळी शासनाला बांगड्याचा आहेर देण्यात आला.

 सदर महा मोर्चा मध्ये करमाळा मुस्लिम समाजातील अल कुरेश जमात संघटनेने तहसील कार्यालयाच्या आवारात आलेल्या आंदोलनकर्त्यांना पिण्याच्या पाण्याची बाटल्या वाटप करण्यात आल्या

सदर महामोर्चा मध्ये सकल मराठा समाज सहित इतर बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 सदर निषेध मोर्चामध्ये महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होतीसाधारणतः दहा ते पंधरा हजार चा समुदाय सदर आंदोलनात सहभागी झाला होता यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी शंभर पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा तसेच होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात केले होते. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर करमाळा तालुक्याच्या इतिहासात हा मोर्चा ऐतिहासिक ठरला आहे.

कारण करमाळा शहर तसेच करमाळा तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील सकल मराठा समाज बांधव हजारोच्या संख्येने शासनाचा निषेध करण्यासाठी एकत्रित जमला होता.

karmalamadhanews24: