आमदार शिंदेंचा उजनीतील पाणी पळविण्याचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही; कुणी केला हा आरोप ? क्लिक करून वाचा सविस्तर
करमाळा(प्रतिनिधी);
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे व बंधू आमदार बबनराव शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन उजनी धरणातून सीना-माढा, दहीगाव उपसा सिंचन योजना,उजनी कालवा, कंदर बोगदा या योजनेद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
ही मागणी उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यावरती अन्याय करनारी आहे.असे मत वांगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष डॉ.विजय रोकडे यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी रोकडे यांनी बोलताना सांगितले की पावसाळ्याचे अडीच महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे.तरी उजनी धरणातील पाणी साठा अवघ्या तेरा टक्क्यांवरती आहे.मागील वर्षी याच वेळी धरणातील पाणी पातळी शंभर टक्के होती.
परंतु सद्यस्थितीत पाणी पातळी अल्प प्रमाणात आहे.भविष्यात अशीच परिस्थिती राहीली तर आगामी काळात उजनी लाभक्षेत्रातील ऊस,केळी सह इतर फळबागांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.
त्यामुळे येथील शेतकरी प्रचंड धास्तावला आहे. उजनी धरणासाठी येथील शेतकर्यांनी कसदार जमिनी दिल्या, वसलेली गावे प्रकल्पासाठी उठविण्यात आली.
परंतू प्रकल्प ग्रस्तांना विचारात न घेता उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे.उजनीच्या पाण्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी दारी आमदार या नात्याने शिंदे यांची आहे.
तरीही विद्यमान आमदारांकडूनच दहीगाव उपसा सिंचन योजनेचे नाव पुढे करुन माढा तालुक्यातील गावांना पाणी पळवण्याचा घाट घातला जात आहे.परंतु कदापिही हा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही असे डॉ.रोकडे यांनी बोलताना सांगितले.
हा तर आमदार शिंदे बंधूंचा उजनीचा पाणी पळवण्याचा डाव
करमाळा तालुक्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली असून सध्या पाण्याचे भीषण संकट करमाळा तालुक्यावर भविष्यात येणार आहे.
अशातच आमदार बबनदादा शिंदे तसेच आमदार संजय मामा शिंदे या दोघा बंधूंनी उजनी धरणातील पाणी सीना माढा बोगद्यातून कालव्याद्वारे तसेच दहीगाव उपसा सिंचन योजनेद्वारे सोडण्या साठी शासन दरबारी निवेदन दिले आहे.
मात्र सध्या उजनी धरणात फक्त 13 टक्केच पाणी असल्याने ते पाणी उजनी परिसरातील विशेषता करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी व पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी करमाळा तालुक्यातील नागरिकांमधून जोर धरीत आहे मात्र उलटपणे आमदार शिंदे बंधू उजनीचे पाणी पळवण्याचा प्रयत्न करीत आहे.