प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान करणार उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान; शिक्षकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान करणार उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान; शिक्षकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान रावगाव ता. करमाळा ही संस्था करणार आहे यावेळी संस्थेच्या वतीने पुरस्कारार्थी शिक्षकांचा सन्मान शाल ,श्रीफळ, प्रशस्तीपत्र, व सन्मान चिन्ह देऊन केला जाणार आहे.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा .रामदास कांबळे बोलताना म्हणाले की, शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षण मुलांचे शिक्षण प्रक्रियेतील पाया असून हा पाया मजबूत करण्याचे कार्य हे शिक्षक करत असतात.

ज्या वयामध्ये या मुलांना जीवन जगण्याचे ज्ञान नसताना हे शिक्षक मुलांना जगण्याचे व ज्ञानाचे धडे देऊन उद्याच्या विशाल जगात मार्गक्रमण करण्यासाठी त्यांच्या जीवनाचा पाया मजबूत करण्याचे कार्य हे शिक्षक करत असतात म्हणून प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानने तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्याचे ठरवले आहे.

तरी शिक्षकांनी आपले प्रस्ताव ३१ ऑगस्ट पर्यंत संस्थेकडे पाठवण्याचे आव्हान संस्थेचे अध्यक्ष मा. रामदास कांबळे (मो.नं.9359129373) यांनी म्हटले आहे .

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line