केमच्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या मुलाचे यश; UPSC परीक्षेत देशात 36 वा

केमच्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या मुलाचे यश; UPSC परीक्षेत देशात 36 वा 

केम(संजय जाधव);  करमाळा तालुक्यातील कंदर येथील तुषार श्रीहरी शिंदे यांची UPSC मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत इंडियन फाॅरेस्ट सव्हिर्स म्हणून भारत देशात ३६ व्या क्रंमाकाचे मानकरी ठरले आहेत.

या बद्दल केम शहर शिवसेना (ऊ,बा,ठा) गटांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी युवासेनेचे सागर तळेकर , तालुका उपप्रमुख श्रीहरी भैय्या तळेकर माजी उपतालुकाप्रमुख उत्तरेश्वर तळेकर प्रसिध्दी प्रमुख अविनाश तळेकर ऊत्तरेश्वर गोडगे, आदि उपस्थित होते. तुषार शिंदे हा कंदर येथील निष्ठावंत शिवसैनिक श्रीहरी शिंदे यांचे चिरंजीव आहे. 

   

 या वेळी युवा सेनेचे सागर तळेकर म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थी यु,पी, एस,सी सारख्या अवघड परिक्षेत देशात ३६ वा क्रंमाक मिळवून तुषार शिंदे यानी यश संपादन करून दाखवले हा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. 

तुषार शिंदे यांचे करमाळा तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line