श्रीदेवीचा माळ ते संगोबा रस्ता काम न करता उचलले बिल; स्वातंत्र्यदिनी सामाजिक कार्यकर्ते महानवर करणार आमरण उपोषण
करमाळा (प्रतिनिधी);
करमाळा तालुक्यातील करमाळा बोरगाव घारगाव रस्ता प्रजीमा क्रमांक 05 किमी ०\००ते ०६ \०० श्रीदेवीचा माळ ते संगोबा रस्ता हे काम इस्टिमेट प्रमाणे मुरुम साईड पट्टी मंजूर असताना ते काम ठेकेदाराने कोठेच केलेले दिसून येत नाही, त्यामुळे या कामाची चौकशी होऊन दोषी वर योग्य ती कार्यवाही करावी. यासाठी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज या कार्यालयासमोर ध्वजारोहण नंतर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विनोद महानवर यांनी दिली.
याबाबत दिनांक 10 \7\ 2023 पासून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य , मुंबई
जिल्हाधिकारी साहेब, सोलापूर अधीक्षक अभियंता, सोलापूर कार्यकारी अभियंता, अकलूज उपअभियंता, सां बा विभाग करमाळा यांना वारंवार अर्ज देऊन तसेच उपोषणाचा अर्ज देऊनही फक्त तोंडी व लेखी आश्वासन देऊन चौकशी करण्याचे टाळले जात आहे व संबंधित अधिकारी हे ठेकेदार यांना पाठीशी घालताना दिसून येत आहे.
त्यामुळे मी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर सां बा विभाग अकलूज या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असून गेली एक वर्ष झाले मी संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करत असून संबंधित अधिकारी चौकशी करण्यास टाळाटाळ करत आहेत जोपर्यंत ही चौकशी होत नाही तोपर्यंत माझा लढा चालू राहील असे ते यावेळी म्हणाले.