भोसे परिसरात उडदाचे पीक जोमात; पावसाची प्रतिक्षा

भोसे परिसरात उडदाचे पीक जोमात; पावसाची प्रतिक्षा

केत्तूर (अभय माने) : पावसाळा सुरू झाल्यापासून करमाळा तालुक्यात दमदार व मुसळधार पाऊस झालाच नाही, केवळ रिमझिम पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, बंधारे,तलाव ऐेन पावसाळ्यात कोरडे पडले आहेत.

मोठा पाऊस झाला नसल्याचा फटका तालुक्यातील खरीप हंगामालाही बसला आहे.गेल्या दोन-चार दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसानेही विश्रांती घेतली आहे.

तरीही भोसे येथील दशरथ पाटोळे यांनी यांचे उडदाचे पीक जोमदार आले आहे. त्यांनी सुरुवातीला पाऊस झाल्याबरोबर पेरणी केली होती त्यातच वेळोवेळी रिमझिम पाऊस पडत असल्याने तो या उडीद पिकाला लाभदायक ठरला आहे .

     पावसाअभावी शेतीला पाण्याची कमतरता जाणवत आहे त्यातच मशागतीची वाढलेले दर, खताच्या वाढलेल्या किमती, विहिरी, तलाव,बोअर,नाले यांची भूगर्भातील पातळी खालावलेली पाणी पातळी उजनीची पाणी पातळीही (अधिक 13 टक्के) जेमतेमच वाढत असल्याने शेतकऱ्यापुढे अडचणीचा डोंगर उभा असूनही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाच्या पेरण्या केल्या परंतु,आलेली पिके पावसाअभावी सध्या कोमेजून चालली आहेत.

परंतु या संकटावर मात करीतही उडदाची पीक मात्र तरारून आले आहे.

   तालुक्यातील तलावामध्ये या पावसाळ्यात पाणी न आल्याने सर्व तलावांनी तळ गाठले आहेत या तालावर पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

छायाचित्र- भोसे (ता. करमाळा)दशरथ पाटोळे यांचे तरारुण आलेले उडीदाचे पीक .

karmalamadhanews24: