उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम येथे ‘सरीवर सरी पावसाची गाणी’ उपक्रम संपन्न
केम (प्रतिनिधी संजय जाधव):
केम- श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम याठिकाणी सरीवर सरी पावसाची गाणी हा काव्यमैफलीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार श्री संजयबापू जाधव तर प्रसिद्ध कवी श्री सोमनाथ टकले हे उपस्थित होते. यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर, श्री मिलिंद नरखेडकर तर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री सुभाष कदम हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य डॉ .बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वहस्तलिखित पावसाळी कवितेच्या भितीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी पावसाळी कविता तालासुरात म्हटल्या.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री संजयबापू जाधव यांचा सेवानिवृत्तीमुळे गौरव करण्यात आला. आपल्या भाषणात श्री संजय जाधव यांनी या नवोपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो असे सांगितले. सुप्रसिद्ध कवी श्री सोमनाथ टकले यांनी कविता कशी तयार करायची, तिचे कसे वाचन करावयाचे हे सांगून यावेळी त्यांच्या प्रसिद्ध वात्रटिका ऐकवल्या. श्री दयानंद तळेकर यांनी स्वतः तालासुरात एक कविता म्हणत विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात असे नवोपक्रम महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्राचार्य श्री सुभाष कदम यांनी उत्तरेश्वर कॉलेजची गुणवत्ता व आदर्श वाटचाल, येथील नवोपक्रम याविषयी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.जागृती साळवे हिने केले तर प्रास्ताविक कु.सानिया पठाण तर आभारप्रदर्शन कु.सायली बिचीतकर हिने केले. या कार्यक्रमास प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे , प्रा.संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे, श्री राजाभाऊ केंगार यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम येथील विद्यार्थ्यांनी केले.