कुंभेज फाटा रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा द्या; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

कुंभेज फाटा रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा द्या; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

केत्तूर (अभय माने):  करमाळा तालुक्यातील दळणवळणाच्या द्रुष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कुंभेज फाटा-पारेवाडी-जिंती चौक ते डीकसळ ते भिगवण या जिल्हा प्रमुख मार्गाला राज्य मार्गाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखाना संचालक गणेश झोळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, हा मार्ग सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. तसेच संपूर्ण मार्ग उजनी लाभक्षेत्रालगत असल्यामुळे या परिसरात ऊस, केळी, पप़ई सह ईतर अन्य फळ पिकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे हा परिसर फ्रृट व शूगर बेल्ट म्हणून ओळखला जातो, तसेच आठ ते दहा साखर कारखान्यांची ऊस वाहतूक याच मार्गावरून होत असते.

     या परिसरातील समृद्धीसाठी, कृषि क्षेत्राला व्यवसायिकद्रष्ट्या सबळ करण्यासाठी व विस्तिर्ण ऊजनी जलाशयातील पक्षी निरीक्षण, क्रृषि पर्यटन, मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी या मार्गाला राज्य मार्गांचा दर्जा देऊन विकसित करणे गरजेचे आहे. या मागणीचा विचार करुन राज्य मार्गाचा दर्जा देण्यात यावा. सदर निवेदनाच्या प्रति महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा, अकलूज, सोलापूर यांना देण्यात आल्या आहेत.

karmalamadhanews24: