केम येथे हरिनाम सप्ताह व श्रीमत भागवत कथेचे आयोजन

केम येथे हरिनाम सप्ताह व श्रीमत भागवत कथेचे आयोजन 


केम (प्रतिनिधी- संजय जाधव):
केम येथील श्री ऊत्तरेश्वर मंदिरामध्ये अधिक मास निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. 
हा सप्ताह दि,७/८ ते १४/८ या कालावधीत होणार आहे यामध्ये सकाळी ८ वा श्रीस अभिषेक व ९ ते १२ भागवत कथा, दुपारी १२ ते २ भोजन २ ते ५ भागवत कथा, सायंकाळी ९ ते ११ कीर्तन व हरी जागर असे नित्यनेमाने धामींक कार्यक्रम होणार आहेत. या भागवत कथेचे कथाकार ह,भ,प, रविद्रंजी महाराज परेराव, सोयगाव जि संभाजी नगर तर त्यांना साथ देणारे तबलावादक ह,भ,प पुरूषोत्तम राउत, आॅर्गन वादक ह,भ,प भूषन महाराज गायनाचार्य

ह,भ,प रघुनाथ महाराज पाटील, राहुल महाराज, शरद महाराज, विशेष सहकार्य. महामुनी अगस्ती महाराज, वारकरी शिक्षण संस्था आमखेडा सोयगाव
. कीर्तन कार ह,भ, सुभाष महाजन,ह,भ,प, अनिरुध्द ह,भ,प, निवृत्ती महाराज निंबाळकर, ह,भ,प, मनोज शहा ह,भ,प, परमेश्वर खोसे, ह,भ,प,शिवलाल स्वामी महाराज तर काल्याचे कीर्तन सकाळी १०ते१२या वेळेत ह,भ,प, रविंद्रजी महारज यांचे होणार आहे त्यानतर बरोबर १२वा,५ मी, पुष्प वृष्टी करण्यात येइल त्यानंतर श्रीची आरती होइल, त्यांनंतर आलेल्या हजारो भावीक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येइल. या सप्ताहाचा केम पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे वतीने करण्यात आले आहे.हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी केम ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line