अबब! उजनी जलाशयात सापडला चक्क २५ किलोचा मासा
करमाळा (प्रतिनिधी)- वाशिंबे, ता. करमाळा येथे उजनी जलाशयातील ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाजवळ मच्छीमारी करत असताना मच्छिमार भंडारी यांना हा कटला जातीचा २५ किलो वजनाचा मासा सापडलेला आहे .
पुणे जिल्ह्याच्या घाठ माथ्यावर होत असलेल्या पावसामुळे उजनी जलाशयात संथगतीने पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे. यामुळे विविध जातीचे मासे काही प्रमाणावर सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.
एकेकाळी उजनी जलाशयाचे अथांग गोड पाणी चवदार माशांचे सर्वात मोठे आगर म्हणून ओळखले जात होते. परंतु जलाशयात वाढते प्रदूषण व तसेच परप्रांतीय मच्छीमारांकडून होत असलेली बेसुमार मच्छीमारी यामुळे अस्सल गावरान मासे नामशेष होत आहेत.
मच्छीमार श्री.भंडारी यांना हा कटला जातीचा मासा मच्छी मार्केटला विक्रीसाठी नेऊन २०० रुपये प्रती किलो प्रमाणे विकला. त्यामुळे त्यांना केवळ एका माशाचे ५०००रू. मिळाले आहेत.
उजनी जलाशयात स्थानिक व आध्रं मधील परप्रांतीय मच्छिमारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहे. उजनी बॅकवॉटर परिसरात मोठ्या प्रमाणावर मच्छिमारी केली जात असून चिलापी,रव,कटला,वाम,गुगळी,शिंगटा,जातीचे मासे आहेत.
— योगेश झोळ (स्थानिक शेतकरी,वाशिंबे)