शनिवारी चिखलठाण येथे महाआरोग्य शिबिर; राजेंद्र बारकुंड मित्र मंडळातर्फे आयोजन

शनिवारी चिखलठाण येथे महाआरोग्य शिबिर; राजेंद्र बारकुंड मित्र मंडळातर्फे आयोजन

करमाळा (प्रतिनिधी);

चिखलठाण तालुका करमाळा येथे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे वतीने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 या शिबिरात सर्व रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे व चष्म्याची वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड जिल्हा दूध संघ माजी उपाध्यक्ष विकासराव गलांडे यांनी दिली आहे.

या शिबिरासाठी नगर पुणे सोलापूर येथील प्रतिष्ठित हॉस्पिटलचे डॉक्टर रुग्ण तपासण्यासाठी येणार आहेत.

आरोग्य शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, तहसीलदार संजय जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, गट विकास अधिकारी राजाराम भोंग, सार्वजनिक बांधकाम विभाग वामन उबाळे सह तालुक्यातील प्रमुख सर्व कार्यालयीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरासाठी चिकलठाण परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line