महिला अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने करमाळयात होणार धरणे आंदोलन; सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन
करमाळा(प्रतिनिधी); मणिपूरमध्ये तीन महिलांवर अत्याचार करून त्यांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याची घटना अतिशय निंदनीय, निषेधार्ह, माणुसकीला काळिमा फासणारी व महिलांच्या सन्मानावर पूर्णपणे गदा आणणारी आहे. गुन्हा घडून दोन महिने झाल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला परंतु सरकार त्याविरुद्ध काहीही करत नाही.
जवळपास तीन महिन्यापासून मणिपूर जातीय हिंसाचाराचे जळत असूनही पंतप्रधान त्यावर साधे निवेदन देखील देण्यास तयार नाहीत. परिणामी महिलांवरील अत्याचारात वाढ होते आहे.
याविरुद्ध शुक्रवार दि. २८/०७/२०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता १ तासाचे धरणे आंदोलन तहसील कार्यालय, करमाळा येथे करण्याचे सर्व जागृक संस्था संघटनांच्या वतीने ठरवण्यात आले आहे.
तरी सर्वांनी महिलांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सदर आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.