विनापरवाना मुरूम उचलणाऱ्या करमाळा तालुक्यातील घारगाव ग्रामपंचायतीची चौकशी करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
करमाळा(प्रतिनिधी); विनापरवाना मुरूम उचलणाऱ्या ग्रामपंचायतची चौकशी करून पंचनामे करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवीण होगले यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना पाठवलेले निवेदनात पुढे असे म्हटले आहे की मौजे घारगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे शिंगटे वस्ती दत्त मंदिर, येथे रस्त्याचे काम चालू असून सदर कामाचे B1 करून ते काम ग्रामपंचायत स्वतः करत आहे शिंगटे वस्ती,येथील शासकीय तळ्यामधील मुरूम काढून सदर रस्त्यावर टाकला आहे, सदर मुरूम टाकताना आपल्या विभागाची कोणतीही परवानगी न घेता कोणतीही रॉयल्टी न भरता बेकायदेशीर कृती करून सरकारची फसवणूक केलेली आहे.
तरी सदर घटनेचा तात्काळ पंचनामा करून ग्रामपंचायत सरपंच,ग्रामपंचायत सचिव, यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल कायदा कलम 48/7 48/8 नुसार कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाजसेवक प्रवीण भाऊ होगले यांनी निवेदनात दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती मा जिल्हाधिकारी साहेब सोलापूर, प्रांत अधिकारी साहेब उपविभागीय अधिकारी कुर्डवाडी, मा तहसीलदार तहसील कार्यालय करमाळा, मा मंडलाधिकारी अर्जुन नगर, मा तलाठी भाऊसाहेब घारगाव ,ग्रामसेवक घारगाव यांना देण्यात आले आहे.