जेऊर येथील डॉ धनंजय बंकटराव कदम यांना सह आयुक्त पदी पदोन्नती

जेऊर येथील डॉ धनंजय बंकटराव कदम यांना सह आयुक्त पदी पदोन्नती

करमाळा: (प्रतिनिधी):

जेऊर तालुका करमाळा

येथील रहिवासी डॉ धनंजय बंकटराव कदम यांची सह आयुक्त पदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.

जेऊर गावचे भुषण डाॅ कदम हे  2014 च्या बॅचचे आयआरएस (IRS) अधिकारी आहेत.  डॉ धनंजय बंकटराव कदम हे

2014 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची 381व्या क्रमांकाने निवड झाली होती. त्यानंतर रत्नागिरी व कोल्हापूर या ठिकाणी अनुक्रमे सहायक आयुक्त व उपायुक्त पदी त्यांनी काम केले होते. 2020-21 या वर्षी त्यांना पुणे विभागात विशेष कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट कार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

2021 पासून पुणे येथे सीमाशुल्क उपायुक्त पदी ते कार्यरत होते . नोव्हेंबर 2023 ला त्यांची बदली वस्तू व सेवा कर विभागात झाली होती. आज त्यांची पुणे येथे  सहआयुक्त पदी पदोन्नती झाली आहे. त्याअनुशंगाने भारत सरकारचे सचिव एस ए अन्सारी यांनी पत्र दिले आहे. ग्रामीण भागातील डाॅ बंकटराव कदम यांना त्यांच्या यशस्वी कर्तृत्वाने त्यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line