अवकाळी पाऊस करमाळा तालुक्यात पथ्यावरच

अवकाळी पाऊस करमाळा तालुक्यात पथ्यावरच

केतूर (अभय माने): गेली काही दिवसात करमाळा तालुक्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने कांदा, द्राक्षे, केळी व भाजीपाला पिकाचे नुकसान केले असले तरी, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस शेतकऱ्यांच्या पथ्यावरच पडला असून रब्बी हंगामातील पेरणी झालेल्या पिकासाठी पोषक वातावरण तयार केले आहे तर पेरणी झालेल्या ज्वारी पिकासाठी हा पाऊस वरदान ठरणार आहे . तोडणी झालेल्या उसाच्या शेतामध्ये गहूं, हरभरा, मका पेरणीला सुरुवात झाली आहे. ऊस तोडणी झालेल्या शेतात शेतकरी गहू पेरणीला प्राधान्य देत आहेत . तर उजनी लाभक्षेत्रात केळी लागवडीचे क्षेत्र वरचेवर वाढत आहे.

करमाळा तालुक्यात पेरणी झालेले सरासरी क्षेत्र

ज्वारी — 64.68 %

गहू– 38%

मका — 90.28%

हरभरा — 44.92 %

karmalamadhanews24: