निर्मळ पिंपरी गावातील दलितांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध! नागेश कांबळे यांच्या वतीने निवेदन

निर्मळ पिंपरी गावातील दलितांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध! नागेश कांबळे यांच्या वतीने निवेदन

करमाळा : ग्रामपंचायत निवडणूकीचा राग मनात ठेवून अहमदनगर जिल्ह्यातील निर्मळ पिंपरी या गावात दलित कुटुंबावर 400/500 गावगूंडांनी मिळून हल्ला करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला हि अतिशय निंदणीय घटना असून आरोपी हल्ला व मारहाण करत असताना यांचे मणिपूर अन खैरलांजी करा अशी चिथावणीखोर वक्तव्ये करत होती हे पाहता दलितांविरोधात जाणीवपूर्वक षडयंत्र होत असताना दिसून येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

  करमाळा पोलिस स्टेशन व तहसिलदार कार्यालयास दिलेल्या या निवेदनात पूढे म्हटले आहे कि आरक्षणासारख्या विषयांवर राज्यभर संघर्षाचे वातावरण असताना दलित सवर्ण संघर्ष निर्माण होतो कि काय अशी परिस्थिती निर्माण होण्याअगोदरच निर्मल पिंपरी येथील गावगूंडावर कारवाई करावी अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line