आ.संजयमामा शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; करमाळा तालुक्यातील ‘या’ गावांच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी; वाचा कोणत्या गावाला किती निधी?
करमाळा (प्रतिनिधी):
महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 7 डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू झाले आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये बांधकामासाठी तरतूद केल्याची बजेट प्लेट आज जाहीर झाली असून यामध्ये करमाळा मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग ,ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग यांच्यासह तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी तब्बल 68 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या भरघोस निधीमुळे तालुक्यातील मुख्य रस्त्यांचा प्रश्न निकाली निघणार आहे.
या निधीमधून महसूल विभागातील 8 मंडळ अधिकारी कार्यालय व 20 तलाठी कार्यालयांची बांधकामे करण्यासाठी 4 कोटी 20 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच पारेवाडी ते वाशिंबे रस्ता मोठ्या मुलाचे बांधकाम करणे – 3 कोटी 47 लाख, कुगाव चिखलठाण शेटफळ जेऊर या रस्ता – 4 कोटी 90 लाख, पांडे शेलगाव क घोटी केम या रस्ता – 2 कोटी , कोर्टी दिवेगव्हाण पारेवाडी रेल्वे स्टेशन रस्ता -3 कोटी, रायगाव वीट झरे पोपळज केडगाव रस्ता – 1कोटी, मिरगव्हाण अर्जुननगर शेलगाव क सौंदे वरकटणे या रस्ता – 1 कोटी ,बोरगाव करंजे मिरगव्हाण निमगाव नेरले वरकुटे रस्ता -1 कोटी, वांगी नंबर 2 ते इजीमा 12 या रस्ता – 2 कोटी, फिसरे हिसरे हिवरे ते कोळगाव रस्ता – 2 कोटी, केतुर 2 ते केतुर 1 वाशिंबे सोगाव रस्ता या रस्त्याचे रुंदीकरणासह काम करण्यासाठी 7 कोटी 50 लाख ,मांजरगाव कोर्टी ते जिल्हा हद्द रस्ता – 5 कोटी, केतुर 2 ते केतुर 1 वाशिंबे सोगाव रस्ता – 5 कोटी, उमरड ते कोठावळे धनगरवाडी रस्ता – 1 कोटी ,सोगाव ते प्रजिमा क्र.3 रस्ता – 1 कोटी 70 लाख असा तब्बल 41 कोटींचा निधी करमाळा तालुक्यातील रस्ते विकासासाठी मंजूर झालेला असून करमाळा मतदार संघाला जोडलेल्या 36 गावांसाठी 23 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे .या निधीमधून कव्हे लहू म्हैसगाव या रस्ता – 2 कोटी 70 लाख, रोपळे क वडशिवणे ते कंदर या रस्ता – 2 कोटी 70 लाख, जिल्हा हद्द ते रिधोरे तांदूळवाडी सुलतानपूर रस्ता – 2 कोटी 40 लाख, अकोले खुर्द कन्हेरगाव निमगाव ढवळस रस्ता – 2 कोटी, वडाचीवाडी ते सापटणे रस्ता – 1 कोटी 50 लाख, वडाचीवाडी ते शिंदेवाडी रस्ता – 1 कोटी 80 लाख, पिंपरी 2 कोटी, निमगाव ते ते उपळवटे 5 कोटी, रोपळे ते मुंगशी रस्ता -80 लाख, कव्हे ते शिंगेवाडी रस्ता – 1कोटी, रोपळे बिटरगाव शिंगेवाडी रस्ता – 1 कोटी 20 लाख अशी निधीची तरतूद केलेली आहे .करमाळा मतदारसंघासाठी तब्बल 68 कोटी निधी रस्ते व बांधकामासाठी मंजूर झाल्यामुळे हा आमदार संजयमामा शिंदे यांचा निवडणुकीच्या तोंडावरती मास्टर स्ट्रोक मानला जात आहे.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मध्यंतरी करमाळा तालुक्यात खंडित झालेला निधींचा ओघ जुलै 2023 पासून पुन्हा एकदा सुरू झाला असून या निधीमधून महत्त्वाचा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.