करमाळा तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण
केत्तूर (अभय माने ) : संपूर्ण करमाळा तालुक्यासह पश्चिम भागातील उजनी पाणलोट क्षेत्रात मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसानंतर गेल्या दोन-तीन दिवसापासून पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात मिचॉग चक्रीवादळ आल्याच्या पार्श्वभूमीवर ढगाळ वातावरण तयार झाले आहे.मंगळवार (ता . 6) रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही तर सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या.
सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने जणू काही पावसाळी वातावरण तयार झाले होते. हे वातावरण असेच राहिल्यास फळबागा तसेच भाजीपाला पिकांवर रोगराई पडून औषध फवारणीच्या खर्चात वाढ होणार आहे. ढगाळ हवामानामुळे थंडी मात्र गायब झाल्याने रब्बी हंगामातील गहूं, हरभरा पिकांच्या वाढीवर परिणाम होणार आहे .