वाशिंबे येथे भैरवनाथ जन्मोत्सवा निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह
वाशिंबे (सचिन भोईटे):- करमाळा तालुक्यातील पच्छिम भागातील उजनी बॅकवॉटर परिसरातील जागृत देवस्थान म्हणून वाशिंबे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचे मंदिर प्रसिद्ध आहे.येथे सालाबाद प्रमाणे वर्ष १७ वे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,अखंड नामजप यज्ञ सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन २९ नोव्हेंबर पासून होणार आहे. यांची रूपरेषा अशी असणार आहे. पहाटे ५ ते ७ काकडा आरती भजन, सकाळी ७ ते ११ नाम जप यज्ञ,११ ते १२ तुकाराम गाथा भजन, दुपारी १२ वा.भैरवनाथ महाराज आरती, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ ,७ ते ९ हरिकिर्तन सेवा,९ ते १० भोजन पंगत, रात्री १० ते १२ हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
या सप्ताहामध्ये ह.भ.प.आप्पा महाराज राऊत वाशिंबे, ह.भ.प.परम पूज्य बाळासाहेब देवकर महाराज पंढरपूरकर ( तुकाराम महाराजांचे वंशज ), ह.भ.प.श्री.नामदास आप्पा महाराज पंढरपूरकर ( नामदेव महाराजांचे वंशज ), ह.भ.प.श्री.गिरी महाराज पैठणकर, ह.भ.प.श्री. पोपट महाराज कासारखेडकर, ह.भ.प.श्री. गोपीनाथ महाराज बानगुडे, ह.भ.प.श्री.अशोक महाराज जाधव (नारायणगाव),या नामवंत किर्तनकारांची हरीकीर्तन सेवा होणार आहेत. कार्यक्रमाचा प्रारंभ दि. २९/११/२०२३ रोजी होणार असून कार्यक्रमांची सांगता ६/१२/२०२३ रोजी
सकाळी १० ते १२ वा.यावेळेत वाशिंबेचे सुपुत्र ह.भ.प.गायनाचार्य माऊली महाराज झोळ यांचे काल्याच्या हरी कीर्तन सेवेने सप्ताह कार्यक्रमाची सागंता होईल. त्यांनतर कै.चांगदेव भीमराव बोबडे, कै.भगवंत पांडुरंग निमकर यांच्या स्मरणार्थ आणी श्री.श्रीमंत गणपत झोळ, पांडूरंग प्रभू बोबडे, दत्तात्रय मारुती बोबडे, वाशिंबे या सर्व परिवाराच्या वतीने महाप्रसाद भोजन पंगत होणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापन भैरवनाथ मंदिर ट्रस्ट समिती,समस्त ग्रामस्थ वाशिंबे यांच्या वतीने केले जाणार आहे. सर्व भाविकांनी संपुर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती भजनी मंडळ यांनी केली आहे.